January 18, 2026

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला घेऊन पुण्यात विरोधी पक्ष आक्रमक; कॅण्डल मार्च, पाकिस्तानचा झेंडा पेटवला  

पुणे, २३ एप्रिल २०२५: काल पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला असून दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात २८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा समावेश आहे. या घटनेबाबत सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आज पुणे शहर काँग्रेस पक्षाकडून या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पाकिस्तानी झेंडा जाळत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तर स्वारगेट परिसरात शिवसेनेकडून निषेध आंदोलन करण्यात आले.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने मेणबत्ती पेटवत आंदोलन करण्यात आलं आहे. तर गुडलक चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पुतळा जाळत,पाकिस्तानी झेंडा जाळत तीव्र आंदोलन करण्यात आलं आहे.

यावेळी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह ज्या पद्धतीने वल्गना करत होते ते सगळ्या फेल ठरल्या आहे.जी काही घटना घडली आहे त्या घटनेच निषेध व्यक्त करतो.या सगळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाही जबाबदाराचे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा ही आमची मागणी असल्याच यावेळी शिंदे म्हणाले.

तर मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आशिष साबळे म्हणाला की हिंदू आहे या द्वेषापोटी काल २७ पर्यटकांना मारण्यात आलं आहे.हे खूप निंदनीय असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमिषा यांना आव्हान आहे की जशास तसे उत्तर दिलं पाहिजे अस यावेळी साबळे म्हणाला.