कला स्पंदन आर्ट फेअरचे पुण्यातील हे सलग दुसरे वर्षे असून यावर्षीच्या फेअरचे उद्घाटन शुक्रवार दि २४ मे रोजी सायं ५ वाजता रॉयल सुरगाणा प्रिन्सली स्टेटचे महाराज कुमार श्रीमंत महाराज रोहितरावराजे देशमुख पवार आणि आंतरराष्ट्रीय पाहुण्या ऑलिव्हिया फर्नांडिस यांच्या उपस्थित संपन्न होईल, अशी माहिती इंडियन आर्ट प्रमोटर्सचे संस्थापक आणि आयोजक सुदीप चक्रवर्ती यांनी कळविली आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना सुदीप चक्रवर्ती म्हणाले, “कला स्पंदन आर्ट फेअर हे देशातील प्रमुख कला प्रदर्शनांपैकी एक असून समकालीन कलेसाठी हे एक हक्काचे व्यासपीठ आहे. या प्रदर्शनीमध्ये पुणेकरांना जागतिक दर्जाची कला पाहता आणि अनुभविता येईल यासोबतच प्रदर्शनीमध्ये सहभागी कलाकार, कला मास्टर्स यांच्याशी देखील पुणेकरांना थेट संवाद साधला येईल हे ही या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य आहे.”
या कला प्रदर्शनामध्ये व्यावसायिक आणि हौशी कलाकारांनी साकारलेल्या अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग्ज, अलकोहोल इंक आर्ट, वॉटर, ऑईल, अॅक्रॅलिक आणि मिक्स मिडीयम पेंटिंग्ज, रेझिन आर्ट, सिरॅमिक आर्ट, डेकोरेटिव्ह आर्ट, पारंपारिक कला पुणेकरांना अनुभविता येणार आहे. ज्यामध्ये देशभरातील १५० कलाकार आणि कलादालने आपल्या तब्बल १५०० हून अधिक कलाकृती सादर करतील.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही