पुणे, 25 जानेवारी 2023: येरवडा मध्यवर्ती कारागृहात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे के.पी. नांदेडकर यांच्या उपस्थितीत बंद्यांसाठी त्वचा रोग शिबिर, मानसिक आरोग्य स्थिर राहण्यासाठी समुपदेशनपर कार्यशाळा व कायदेविषयक काम पाहणाऱ्या (पीएलव्ही) स्वयंसेवकांसाठी स्टेशनरी साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत ग्लोबल केअर फाऊंडेशन मुंबई या संस्थेने कारागृहातील बंद्यासाठी मोफत कायदेविषयक मदत व मार्गदर्शन आणि त्वचारोग शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात एक हजार बंद्यांनी लाभ घेतला. किंगजींग युथ फाऊंडेशन संस्थापक आयझॅक अगरवाल यांच्यामार्फत कारागृहातील बंद्यांना मानसिक आरोग्य स्थिर राहण्यासाठी तीन महिन्याची समुपदेशपर शाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत २९ बंद्यांनी प्रशिक्षण घेतले.
कायदेविषयक काम पाहणाऱ्या (पीएलव्ही) स्वयंसेवकांसाठी स्टेशनरी साहित्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचाच्या सचिव सोनल पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी श्रीमती पाटील यांनी कायदेविषयक मदतीचा मासिक आढावा घेवून मार्गदर्शन केले.
या उपक्रमास अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग स्वाती साठे यांचे मार्गदर्शन लाभले.
विविध कार्यक्रमात कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ, उपअधीक्षक पल्लवी कदम, आर. ई. गायकवाड, एम. एच जगताप, आनंदा कांदे, वरीष्ठ तुरंगाधिकारी आर. के कानडे जिल्हा विधी ग्लोबल केअर फाऊंडेशन संस्थापक तथा व्यवस्थापक संचालक अबीद अहमद कुंडलक आदी उपस्थित होते.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही