पुणे, दि. २५ जून, २०२४ : पं. अजॉय चक्रबर्ती यांचे शिष्य व गायक अमोल निसळ यांच्या स्वरनिनाद संस्थेतर्फे येत्या शनिवार २९ व रविवार ३० जून रोजी युव रंग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. टिळक रस्त्यावरील भावे प्राथमिक शाळेचे सभागृह या ठिकाणी दोन्ही दिवशी सायं ५.३० वाजता सदर कार्यक्रम संपन्न होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
‘स्वरनिनाद’ या संस्थेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या गंगाधर स्वरोत्सवाच्या दहाव्या वर्षाचे औचित्य साधत आश्वासक युवा कलाकरांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे या उद्देशाने स्वरनिनाद या संस्थेच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम हाती घेत आहोत, अशी माहिती यावेळी अमोल निसळ यांनी कळविली आहे.
सदर कार्यक्रमात मैत्रेयी भोसले (गायन), सोहम गोराणे (तबला), अनिरुद्ध ऐथल (गायन), षड्ज घोडखिंडी (बासरी), रागिणी देवळे (गायन), सुरंजन जायभाये (गायन), आशिष- श्रेयस- वेधा- सिद्धी (व्हायोलिन) तर राधिका करंदीकर (नृत्य) हे कलाकार सादरीकरण करणार आहेत. यावेळी अभिनय रवंदे, कार्तिक स्वामी, यशद गायकी, अथर्व कुलकर्णी, शुभम शहा, अजिंक्य जोशी हे कलाकार साथसंगत करतील.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही