पुणे, ३०/०५/२०२४: पुण्यातील गृहबांधणी व्यवसायातील आघाडीचे नाव असलेल्या परांजपे स्कीम्स ने त्यांच्या ब्लू रिज टाउनशिप, फॉरेस्ट ट्रेल्स टाउनशिप तसेच वाकड येथील ब्रॉडवे या गृहप्रकल्पांमधील १००० हून अधिक सदनिकांचा ताबा देण्याची सज्जता केली आहे. तीनही प्रकल्पातील या सदनिकांचे एकंदर क्षेत्रफळ ४,५०,००० असेल. परांजपे स्कीम्स या ब्रॅंड ची ग्राहकांबद्दलची बांधिलकी आणि उत्तम गुणवत्तेची घरे बांधण्याची क्षमता यांना अधोरेखित करणारा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
या सदनिकांची भर पडून परांजपे स्कीम्स चा पुण्यातील व्यवसाय विस्तारणार आहे. ग्रूव्हज या ब्लू रिज मधील संकुलात या आधी ४५०० घरांचा ताबा देण्यात आला आहे. फॉरेस्ट ट्रेल मध्ये या आधी ताबा देण्यात आलेल्या घरांमध्ये अथश्री मधील नव्या घरांची भर पडणार आहे. परांजपे स्कीम्स च्या वाकड येथील ब्रॉडवे या प्रीमियम प्रकल्पाला या आधीच्या टप्प्यातही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता.
परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक श्री शशांक परांजपे म्हणाले, ” या १००० हून अधिक सदनिकांचा ताबा देण्याची घोषणा करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. उत्तम गुणवत्तेची घरे बांधून पूर्ण करण्याच्या आमच्या ट्रॅक रेकॉर्ड हमीचा प्रत्यय यातून येत आहे. आमचे ग्राहक आम्हाला अत्यंत प्रिय आहेत आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास आम्ही बांधील आहोत. ग्राहकाने ज्या प्रकारचे घर घेतले असेल त्या प्रकारातील सर्वोत्तम घर मिळाल्याचा आनंद त्याला देण्यावर आम्ही आमचे सर्व लक्ष केन्द्रित करतो. आमच्या वाकड, हिंजवडी आणि भूगांव येथील या प्रकल्पांत वास्तव्य हा एक अजोड अनुभव ठरावा हा उद्देश या प्रकल्पांचे नियोजन करताना असतो. या नव्या प्रकल्पांतील ग्राहकांचे आम्ही त्यांच्या घरांत स्वागत करतो.”
या नुकत्याच पूर्ण झालेल्या प्रकल्पांत परांजपे स्कीम्स ची अजोड प्रकल्प परिपूर्ती क्षमता, कसलीही तडजोड न करता उच्च गुणवत्ता निकषांचे पालन आणि गृहनिर्माण क्षेत्रातील विश्वसनीयता हे सारे प्रतिबिंबित झाले आहे.
परांजपे स्कीम्स विषयी :
35 वर्षांहून दीर्घ परंपरा असलेल्या परांजपे स्कीम्स ने आजवर 210 उत्तम प्रकल्प पूर्ण केले आहेत. देशातील 9 शहरात परांजपे स्कीम्स चे निवासी आणि व्यापारी प्रकल्प उभारले गेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी निवासी प्रकल्प विकसित करण्याची सुरुवात परांजपे स्कीम्स ने केली तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी खास सोयी असलेली घरेही निर्माण केली. पुणे शहरात परांजपे स्कीम्स चे स्थान ठळकपणे जाणवते तसेच मुंबई ठाणे, बंगळुरू आणि वडोदरा येथेही कंपनीचे प्रकल्प आहेत.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी