पुणे, 10 मे, 2023 : पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या वतीने पीएमडीटीए – पुरुष व महिला जिल्हा टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात उपांत्यपुर्व फेरीत वैष्णवी सिंग व आशी छाजेड यांनी मानांकीत खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असेलेल्या या स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत महिलांच्या गटात बिगर मानांकित वैष्णवी सिंगने दुस-या मानांकित भाविका गुंडेचा हिला 7-4 असा तर आशी छाजेडने तिस-या मानांकीत सिमरण छेत्रीला 7-3 असा पराभवचा धक्का देत उपांत्य फेरीत धडक मारली. अव्वल मानांकीत तन्वि तावडेने तनया देशपांडेचा व चौथ्या मानांकीत रमा शहापुरकरने नियती जिरांगेचा प्रत्येकी 7-0 असा एकतर्फी लढतीत पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पुरूष गटात अव्वल मानांकित प्रणव गाडगीळने पाचव्या मानांकित शिलादित्य बॅनर्जीचा व दुस-या मानांकीत निशित रहाणे हिने आठव्या मानांकीत आकाश खैरे हीचा प्रत्येकी 7-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तिस-या मानांकित पार्थ चिवटेने सहाव्या मानांकित अजिंक्य पाटणकरचा व चौथ्या मानांकित व्यंकटेश आचार्यने सातव्या मानांकित सुनील लुल्लाचा प्रत्येकी 7-2 असा सहज पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपुर्व फेरी: पुरुष:
प्रणव गाडगीळ(1)वि.वि. शिलादित्य बॅनर्जी(5) 7-3
निशित रहाणे(2) वि.वि. आकाश खैरे (8) 7-3
पार्थ चिवटे(3) वि.वि. अजिंक्य पाटणकर(6) 7-2
व्यंकटेश आचार्य(4) वि.वि. सुनील लुल्ला(7) 7-2
महिला:
तन्वि तावडे(1) वि.वि तनया देशपांडे 7-0
वैष्णवी सिंग वि.वि भाविका गुंडेचा(2) 7-4
आशी छाजेड वि.वि सिमरण छेत्री (3) 7-3
रमा शहापुरकर(4) वि.वि नियती जिरांगे 7-0
More Stories
भाषिक कौशल्यातून रोजगाराच्या अनेक संधी: प्रो. पराग काळकर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हिंदी दिवस सोहळा आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रम संपन्न
केंद्र सरकारच्या सहकारी संस्थांबाबतच्या नवीन कायद्याची माहिती घेऊन विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्यवसाय उभे करावेत – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील