पुणे, २८/०४/२०२३: पिंपरी-चिंचवड शहरातील ऐतिहासिक, प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांची सफर नागरिक / पर्यटकांना घडविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ हि बससेवा दि. ०३/०८/२०१९ पासून सरू करण्यात आली होती, सदर बस सेवेकरिता प्रवाशी, नागरिक, पर्यटकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात सदरील बससेवा स्थगित ठेवण्यात आली होती.
सध्या ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवा सुरु करणेबाबत प्रवाशी, नागरिक, पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेता पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुन्हा ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवा हि दि. ०१/०५/२०२३ रोजी पासून २ वातानुकुलीत बसेसद्वारे पूर्ववत सुरु करण्यात येत आहे.
निगडी (भक्ती शक्ती) बसस्थानक येथून ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवा सकाळी ०९:०० वाजता सुरु होईल.
‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवा ऐतिहासिक / प्रेक्षणीय स्थळांची माहिती खालीलप्रमाणे
.
ऐतिहासिक / प्रेक्षणीय स्थळांची नावे
१ भक्ती शक्ती उद्यान (रनिंग)
२ प्रतिशिर्डी शिरगांव
३ देहुगांव (मुख्य मंदिर)
४ देहू गाथा मंदिर
५ बर्ड व्हॅली
६ सायन्स पार्क
७ चाफेकर बंधू स्मारक (रनिंग)
८ श्री. मोरया गोसावी मंदिर
९ मंगलमुर्ती वाडा
१० चाफेकर वाडा
११ इस्कॉन मंदिर
१२ अप्पूघर / दुर्गा टेकडी
‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवेमध्ये प्रतिप्रवासी रक्कम रु. ५००/- तिकीट दर आकारणी करण्यात येणार आहे.
‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बसेसचे तिकीट वितरण निगडी, भोसरी व पिंपरी लोखंडे भवन येथील पास केंद्रावर उपलब्ध असणार आहेत.
वेळे अभावी पर्यटन स्थळ / ठिकाण वगळले जावू शकते याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
सदर बसची वेळ सकाळी ०९:०० ते सायंकाळी ०७:१५ अशी राहील.
More Stories
महापालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य शिबीरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण
सक्षम पिढी घडवायची असेल तर त्यांचे नाते निसर्गाशी दृढ करणे आवश्यक – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे