पुणे, 9 जून 2023- पूना क्लब लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित ग्रॅविटस फाउंडेशन प्रायोजित व कॉनव्हेक्स सहप्रायोजित पूना क्लब रॅकेट लीग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत डिलाईट्स व ऑल स्टार्स या संघांनी अनुक्रमे शार्क्स व लायन्स संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पूना क्लबच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन, स्क्वॅश कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत ऑल स्टार्स संघाने लायन्स संघाचा 235-229 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. बॅडमिंटनमध्ये ऑल स्टार्स संघाला लायन्सकडून 58-69 असा, तर स्क्वॅशमध्ये ऑल स्टार्सला लायन्सकडून 38-63 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर टेबल टेनिसमध्ये मात्र परम लुनावत, संजय श्रीवास्तव, मृणाल शहा, रशीद खोरशेदी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर ऑल स्टार्स संघाने लायन्स संघाचा 67-51 पराभव करून हि आघाडी कमी केली. अखेर टेनिसमध्ये संजय श्रीवास्तव, डॅरियन माझदा, किरण सोनवणे, किरण सांघवी, मृणाल शहा, अभिजीत गानू, ऐश्वर्या श्रीवास्तव, सोहेल सांघवी यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर ऑल स्टार्स संघाने लायन्स संघाचा 72-46 असा पराभव करून विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात रोनक शहा, सतीश मुंदडा, इवाना गाडा, जसप्रीत सिंग, करण पटेल, क्रिश डेंबला, जयदीप पटवर्धन, रिया देशपांडे, रवि पिट्टी, सचिन राठी यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर डिलाइट्स संघाने शार्क्स संघाचा 252-227 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
ऑल स्टार्स वि.वि.लायन्स 235-229
बॅडमिंटन: ऑल स्टार्स पराभुत वि.लायन्स 58-69(लैला अल्लाना/डॅरियन माझदा वि.वि.कुणाल सांघवी/ईश कोहली 11-08; परम लुनावत/किरण सांघवी पराभुत वि.योगेश ठुबे/पवीत पठेजा 12-15; आरुषी पांडे/अमित परमार पराभूत वि. पंकज शहा/अर्णव साठे 10-15; मृणाल शहा/सनत परमार पराभुत वि.मोक्षित पोरवाल/अमरजीत छाब्रा 25-31);
स्क्वॅश: ऑल स्टार्स पराभुत वि.लायन्स 38-63(आयशा खन्यारी पराभुत वि.पवित्र पथेजा 00-11, सिद्धांत सांघवी पराभुत वि.अमन खन्यारी 02-15; मृणाल शहा पराभुत वि.कुणाल सांघवी 05-15; विवान रांका वि.वि.योगेश ठुबे 31-22) ;
टेबल टेनिस: ऑल स्टार्स वि.वि.लायन्स 67-51(लैला अल्लाना/आदिव शहा पराभुत वि.अर्णव साठे/तनुश्री 09-11; किरण सांघवी/धीरेन शहा पराभुत वि.अनिल हिंगोरानी/ऋषिकेश अधिकारी 12-15; परम लुनावत/संजय श्रीवास्तव वि.वि.मोक्षित पोरवाल/पंकज शहा 15-11; मृणाल शहा/रशीद खोरशेदी वि.वि.अजय जाधव/त्रिलोक थडानी 31-14);
टेनिस: ऑल स्टार्स वि.वि.लायन्स 72-46 (संजय श्रीवास्तव/डॅरियन माझदा वि.वि.पंकज शहा/जील शाह 11-07; किरण सोनवणे/किरण सांघवी वि.वि.मोक्षित पोरवाल/पवीत पथेजा 15-11; मृणाल शहा/अभिजीत गानू वि.वि.चिराग साबूनानी/अनिल हिंगोराणी 15-09; ऐश्वर्या श्रीवास्तव/सोहेल सांघवी वि.वि.अजय जाधव/ऋषिकेश अधिकारी 31-19).
डिलाईट्स वि.वि.शार्क्स 252-227
बॅडमिंटन: डिलाईट्स वि.वि.शार्क्स 64-51(सोनाली शिंदे/क्रिश शहा पराभुत वि.चेतन घुवालेवाला/प्रकाश भुतरा 06-11; विनय राठी/आर्यन शर्मा पराभुत वि.देव घुवालेवाला/नीरव बाफना 13-15; जयदीप पटवर्धन/अद्विका परमार पराभुत वि.कृष्णा घुवालेवाला/चैत्राली नवरे 14-15; रोनक शहा/सतीश मुंदडा वि.वि.युवल गुलाटी/उमीद कोठावाला 31-10);
स्क्वॅश: डिलाइट्स वि.वि.शार्क्स 72-50 (इवाना गाडा वि.वि.कृष्णा घुवालेवाला 11-05; जसप्रीत सिंग वि.वि.अर्श थवानी 15-14; करण पटेल वि.वि.शिशिर गुप्ता 15-04; क्रिश डेंबला वि.वि.रंजीत बाला 31-27);
टेबल टेनिस: डिलाइट्स पराभुत वि.शार्क्स 50-68(अन्नपूर्णा राठी/आर्यन शर्मा पराभुत वि.कृष्णा घुवालेवाला/पवन सदारंगानी 10-11; सचिन राठी/विनय राठी पराभुत वि.विवान पाटील/रोहित शर्मा 06-15; रोनक शाह/नीलेश खंडेलवाल पराभूत वि.देव घुवालेवाला/चेतन घुवालेवाला 03-15; जयदीप पटवर्धन/रिया देशपांडे वि.वि.सुनील आशर/शिशिर गुप्ता 31-27);
टेनिस: डिलाइट्स वि.वि.शार्क्स 66-58(जसप्रीत सिंग/नीलेश खंडेलवाल पराभुत वि.युवल गुलाटी/ अर्श थवानी 07-11; करण पटेल/विनय राठी पराभुत वि.प्रकाश भुतरा/रंजित बाला 13-15; रोनक शहा/रवि पिट्टी वि.वि. देव घुवालेवाला/शिशिर गुप्ता 15-14; जयदीप पटवर्धन/सचिन राठी वि.वि.चेतन घुवालेवाला/कृष्णा घुवालेवाला 31-18);
More Stories
भाषिक कौशल्यातून रोजगाराच्या अनेक संधी: प्रो. पराग काळकर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हिंदी दिवस सोहळा आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रम संपन्न
केंद्र सरकारच्या सहकारी संस्थांबाबतच्या नवीन कायद्याची माहिती घेऊन विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्यवसाय उभे करावेत – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील