मुंबई,दि. ११/०३/२०२५: सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा बुद्रुक, पुणे या शाळेने बेकायदेशीर स्थलांतर, बांधकाम केले असल्याने मान्यता रद्द करण्याबाबत किंवा कायम ठेवण्याबाबत निर्णय व कार्यवाही होण्यासाठी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य योगेश टिळेकर यांनी सिंहगड सिटी स्कूल कोंढवा बुद्रुक पुणे ही शाळा इमारतीचा विना भोगवटा प्रमाणपत्र वापर सुरू असल्याबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.
राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, शाळेत २१०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा सीबीएसई बोर्डाची आहे, आणि त्याच्यामुळे ह्या शाळेची मान्यता रद्द करावी किंवा योग्य ती कार्यवाही करावी, याबाबत शिक्षण उपसंचालकांना पत्र देण्यात आलेले आहे. महानगरपालिकेने नोटीस दिलेली आहे. २१०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांचे फेर नियोजन करणे गरजेचे आहे. ही आपली सामाजिक बांधीलकी आहे. तथापि, अनधिकृत बांधकाम आणि शाळेवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
More Stories
तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी Rs ५९.७५ कोटी निधीस मान्यता
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पावसामुळे हैराण धानोरी, वडगावशेरी, खराडी परिसर; आमदार बापूसाहेब पठारे यांची अधिवेशनात ठोस उपाययोजनांची मागणी