October 16, 2025

भीम शक्ती संघटनेकडून अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या घरा बाहेर आंदोलन….

पुणे, 10 फेब्रुवारी 2025: अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या नंतर आत्ता पुन्हा एकदा त्यांचा एक व्हिडिओ समोर आलं आहे ज्यात ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं, आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राम्हण ठरतात अस म्हटलं आहे.यावर आत्ता आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले असून भीम शक्ती संघटनेकडून अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या घराच्या बाहेर आंदोलन केल आहे.

अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या नंतर आत्ता पुन्हा एकदा त्यांचा एक व्हिडिओ समोर आलं आहे ज्यात ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं, आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राम्हण ठरतात अस म्हटलं आहे.यावर आत्ता पुन्हा एकदा राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे.

यावेळी भीम शक्ती संघटनेचा पश्चिम महारष्ट्र युवक अध्यक्ष विजय हिंगे म्हणाला की अभिनेता राहुल सोलापूरकर याने सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि मग आत्ता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा आम्ही निषेध करतो.आमची मागणी आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आज जर अभिनेता राहुल सोलापूरकर याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर आमच्याकडुन आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी त्याने दिला.

You may have missed