June 24, 2024

पुना क्लब फिटनेस लीग 2023 स्पर्धेस आजपासून प्रारंभ

पुणे, 22 ऑगस्ट : पुना क्लब लिमिटेड यांच्या वतीने शहरात पहिल्यांदाच पुना क्लब फिटनेस लीग 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा पुना क्लब या ठिकाणी 23 ते 26 ऑगस्ट 2023 या कालावधीत रंगणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पुना क्लबचे अध्यक्ष सुनील हांडा यांनी सांगितले की, स्पर्धेतील सहभागी खेळाडूंची निवड लिलाव पद्धतीने करण्यात आली असून सहभागी खेळाडू हे क्लबचे सदस्य आहेत.  क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव कर्नल सरकार यावेळी उपस्थित होते.  
 
स्पर्धेला अथ-इलाईट स्पोर्ट्स अकादमी व एलेसियम क्लब यांचे मुख्य प्रायोजकत्व, तर फ्लोअर वर्क्स, रुबी हॉल क्लिनिक, सोलफ्युअल आणि सुराणा ट्रेडर्स यांचे सह प्रायोजकत्व लाभले आहे.    
 
बबिता नायडू, मृदुला मोहिते, शर्वरी तांबे, मयांका खेत्रपाल, नयना परमार, ऍरॉन खट्टर, विकास सूद, वरून तेलंग, कर्नल एके नायडू आणि नितीन रजनी हे महागडे खेळाडू ठरले आहेत.   
 
स्पर्धेत जेट्स(राकेश नवानी), गोयल गंगा रिअल रिच(अतुल गोयल व अश्विन शहा), किंग्ज(वीरेंदर सिंग ओबेरॉय व इंद्रनील मुजगुले), ऑल स्टार्स(हिरेन परमार), एसके बॉडी टोनर्स(शैलेश रांका व कुणाल सांघवी), स्पेशल २७ ब्रिक हाऊस(विशाल सेठ), आयोग वेलनेस(आदर्श हेगडे व टोनी शेट्टी), ए अडवानी रिअल्टी सुपर किंग्ज(अनिल अडवानी, मोहनीश अडवानी व वरूण अडवानी), मिशन इम्पॉसिबल(अर्शद अक्कलकोटकर व नितीन रजनी) आणि इस्टेटली लिजेंड्स(मनिष मेहता व आर्यन मेहता) हे १० संघ झुंजणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
लीगविषयी अधिक माहिती देताना पुना क्लबचे मानद सचिव गौरव गढोके म्हणाले की,  या स्पर्धेचा फॉरमॅट अतिशय स्पर्धात्मकरित्या तयार करण्यात आला आहे. स्पर्धेतील १० संघांची विभागणी प्रत्येकी ५ संघ अशी  २ गटात विभागणी करण्यात आली असून यातील अव्वल चार संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे.  यामध्ये १७५ सदस्यांनी आपला सहभाग नोंदवला असून ९वर्षांपासून ते ७७ वर्षापर्यंतच्या स्पर्धक आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. हि स्पर्धा मस्क्युलर स्ट्रेंथ, मस्क्युलर एन्ड्युरन्स आणि कार्डिओ अँड क्रॉसफिट या प्रकारात पार पडणार आहे. 
 
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये गौरव गढोके(स्पर्धा समिती अध्यक्ष), मनजीत राजपाल(स्पर्धा सचिव), तुषार आसवानी(स्पर्धा संचालक) यांचा समावेश आहे.