पुणे, ५ फेब्रुवारी २०२५: महापालिकेतर्फे दहावी व बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी तब्बल १३ हजार ८५४अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जांची छाननी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या थेट खात्यात शिष्यवृत्ती रक्कम जमा होणार आहे.
महापालिकेकडुन दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजना तर, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजना, या दोन्ही योजनेअंतर्गत महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेसाठी महापालिकेने विद्यार्थ्यांकडुन ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज मागविले होते. त्यानंतर महापालिकेने दोन वेळा अर्ज सादर करण्याच्या कालावधीत वाढ केली होती. ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ केल्यानंतर दोन्ही योजनांसाठी १३ हजार ८५४ अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले. त्यामध्ये अबुल कलाम आझाद योजनेसाठी १० हजार ३०५ , तर अण्णाभाऊ साठे योजनेसाठी ३ हजार ५४९अर्ज प्राप्त झाले आहेत. संबंधित अर्जांची छाननी करण्यात येईल, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी दिली.

More Stories
Pune: विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Pune: मेट्रो सफर, रेल्वे म्युझियम पाहून बालगोपाल हरखले
Pune: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना