पुणे, दि. १२/०४/२०२३: अंमली पदार्थ विरोधी पथक एकने कोंढवा परिसरातून ८ लाखांचा ४० किलो २४५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. आरोपीकडून दुचाकी, मोबाइल असा ऐवज हस्तगत करण्यात आला. व्यंकट मनोहर सुर्यवंशी (वय ४० रा. भोसरी, मूळ-उमापुर,ता.बसवकल्याण, बिदर, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विक्री करणार्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एकजण गांजा बाळगून असल्याची माहिती पोलीस हवालदार विशाल दळवी यांना मिळाली. पथकाने सापळा रचून व्यंकट सूर्यवंशी याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून ४० किलोवर गांजा, दुचाकी, मोबाइल असा ८ लाख ६५ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, एपीआय शैलजा जानकर, विशाल दळवी, पांडुरंग पवार, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, सचिन माळवे, राहुल जोशी, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहना शेख, योगेश मोहिते यांनी केली.

More Stories
Pune: पीएमपीएमएल कडून बसस्थानकांचे विद्रुपीकरण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई
पुणे महापालिकेचे आरक्षण जाहीर अनेक प्रभाग उडाले तर महिला सुरक्षित
Pune: आरपीआयच्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी हिमाली कांबळे यांची निवड