पुणे, ०७/०४/२०२३: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी दिलेल्या पैशावर प्रतिमहिना दहा टक्के रक्कम देण्याचे प्रलोभन दाखवत एका व्यवसायिकाची तब्बल 99 लाख 7 हजार 871 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधीत व्यक्तीने त्यांचे घर विक्री करून ट्रेडींगसाठी पैसे दिले होते.
याप्रकरणी, चंदनगर पोलिसांनी नितीन जगन्नाथ गोते (रा. भिवरी,ता.हवेली) याच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हरिष बक्षाणी (वय.51,रा.खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 7 फेब्रुवारी 2022 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत खराडी येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बक्षाणी हे व्यवसायिक आहेत. एका कॉफी शॉपमध्ये दोघांची ओळख झाली. आरोपी गोते याने तुम्ही माझ्याकडे ट्रेडींग करा व तुम्ही मला ट्रेडींगसाठी जी रक्कम द्याल त्यावर मी प्रत्येक महिन्याला दहा टक्के रक्कम देईल असे प्रलोभन दाखविले. प्रलोभनाला बळी पडून बक्षाणी यांनी त्याचे घर विक्री करून एक कोटी रुपये मोतीलाल ओसवाल या डि मॅट खात्यावर जमा केले. तसे त्यांनी स्टॅम्पवर अॅग्रीमेंट केले. आरोपी गोते हा त्यांच्या ट्रेडींग खात्यावरून ट्रेडींग करणार प्रत्येक महिन्याला दहा टक्के रक्कम देणार फायदा किंवा तोटा झाला तरी तो ती रक्कम देणार असे ठरले होते.31 मार्च 2022 मध्ये फिर्यादींनी डी मॅट खात्यावर पाहिले तेव्हा 99 लाख 7 हजार 871 रुपये तोटा झाल्याचे दिसे. याबाबत त्यांनी गोतेला विचारणा केली तेव्हा त्याने की तुमचे खाते मी हेजिंगसाठी वापरले होते व दुसर्या डि मॅट खात्यावर जास्त नफा झाल्याने ते सुरक्षित आहेत.
दरम्यानच्या कालावधीत आरोपीने फिर्यादींना 10 लाख50 हजार रुपये टक्केवारीचे पैसे म्हणून दिले. त्यानंतर पैसे दिले नाहीत. ठरलेल्या करारानुसार आरोपीने फिर्यादींना लॉस झालेले पैसे व टक्केवारी परत न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके करीत आहेत.
More Stories
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान
हडपसर मध्ये प्रशांत जगताप यांना मुस्लिम समाजाचे आव्हान, शरद पवारांकडे महत्वाची मागणी