पुणे, ०४/०७/२०२३: मुलगा बाथरूम मध्ये गेला होता. त्यावेळी त्याच्या एका मित्राने बाहेरून बाथरूमचा दरवाजा लावल्याने संबंधित मुलाने दरवाजा जोरात वाजवला. या कारणावरून क्लासच्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याने संबंधित शिक्षकेवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.
मनोज श्रीराम यावलकर (वय -52 ,राहणार -चिंचवड ,पुणे )यांनी आरोपी शिक्षिके विरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रकार दोन जुलै रोजी कोथरूड मधील भुसारी कॉलनी या ठिकाणी घडला आहे.
,तक्रारदार यांचा १२ वर्षाच्या मुलगा संबंधित शिक्षकेकडे क्लासला गेला होता .त्यावेळी तो बाथरूम मध्ये गेला असताना, त्याच्या मित्राने बाथरूमचा दरवाजा बाहेरून लावला त्यामुळे तक्रारदार यांच्या मुलाने दरवाजात जोरजोरात वाजवल्याने, क्लास घेणाऱ्या संबंधित शिक्षिकेने’ तुला संस्कार शिकवली ,तुला अक्कल नाही तर तुला नागडा करून झोपडपट्टीत फिरवीन, तुला पोलिसात देईन ‘अशी धमकी देऊन त्यांच्या हातात असलेल्या रॉडने मुलास हातावर फटके मारून त्याला दुखापत केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वडिलांनी दोषी शिक्षिके विरोधात थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक व्ही पांढरे याबाबत पुढील तपास करत आहे.
More Stories
भाषिक कौशल्यातून रोजगाराच्या अनेक संधी: प्रो. पराग काळकर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हिंदी दिवस सोहळा आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रम संपन्न
केंद्र सरकारच्या सहकारी संस्थांबाबतच्या नवीन कायद्याची माहिती घेऊन विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्यवसाय उभे करावेत – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील