June 14, 2024

पुणे: कॅम्पमधील दुकानाची टोळक्याकडून तोडफोड, सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, दि. १३/०८/२०२३: भाडोत्री दुकानाचा वाद न्यायालयात सुरु असतानाही संबंधित मालकाने टोळक्याच्या मदतीने दुकानातील साहित्याची तोडफोड करीत १७ हजारांची रोकड चोरुन नेली. ही घटना १९ ते २० जुलैला कॅम्पमधील क्लोअर सेंटरमध्ये घडली आहे.

सर्फराज सलीम हबीब याच्यासह सात ते आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेबूब अब्दुल मजीद आलाना (वय ५१, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा ) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेबुब यांनी आरोपी सर्फराज यांचे दुकान भाडेतत्वावर चालविण्यासाठी घेतले आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून त्यांचा वाद असल्यामुळे प्रकरण न्यायालयात आहे. असे असतानाही, सर्फराजने टोळक्याच्या मदतीने दुकानात शिरुन काउंटरची तोडफोड केली. दुकानातील १७ हजारांची रोकड चोरुन नेत, कामगारांना मारहाण करीत शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अक्षय गायकवाड तपास करीत आहेत.