May 18, 2024

पुणे: अल्पवयीन मुलाला लैंगिक संबंधास भाग पाडले, कोंढव्यातील तरूणीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, दि. २१/०८/२०२३: शेजारी राहणार्‍या अल्पवयीन मुलाला धमकी देउन त्याच्याकडून लैंगिक संबंध प्राप्त करण्यास भाग पाडणार्‍या तरुणीविरूद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मे २०२१ ते नोव्हेंबर २०२२ कालावधीत कोंढवा बुद्रूक परिसरात घडली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरूणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगा आणि आरोपी तरूणी कोंढव्यातील एकाच इमारतीत राहायला आहेत. अल्पवयीन मुलाचे वय १६ असताना तरूणीने त्याला धमकाविले. तु माझ्यासोबत जबरदस्ती केली आहे, अशी तक्रार पोलिसात देण्याची भीती घातली. त्यानंतर मे २०२१ पासून नोव्हेंबर २०२२ पर्यंत अल्पवयीन मुलाला तिने स्वतःसोबत शारिरीक संबंध करण्यास भाग पाडले. त्याचे व्हिडिओ रेकॉडिंग केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तरूणीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.