June 14, 2024

पुणे: अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्राध्यापिकेचा लॅपटाॅप चोरीस

पुणे, १०/०६/२०२३: अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विश्रामकक्षातून प्राध्यापिकेचा लॅपटाॅप चोरून नेल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली. याबाबत प्राध्यापक महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वडगाव बुद्रुक भागातील काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. त्यांनी महाविद्यालयातील विश्रामकक्षात लॅपटाॅप, चार्जर, हेडफोन ठेवला होता. विश्रामकक्षात शिरलेल्या चोरट्याने लॅपटाॅप, चार्जर, हेडफोन ठेवलेली पिशवी चोरून नेली. पोलीस कर्मचारी खटावकर तपास करत आहेत.