May 16, 2024

पुणे: जुगार अड्डयावर छापा टाकुन एकुण १८ जणावर कारवाई

पुणे, २६/०३/२०२३: मार्केटयार्ड परीसरात रम्मी पत्त्याचा जुगार व बिबवेवाडी परिसरात कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन दोन जुगार अड्डयावर छापा टाकुन एकुण १८ जणावर कारवाई केली आहे.तसेच रोख रूपये व जुगाराचे साहित्य असा ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त केले आहे.

मार्केट यार्ड परिसरात रम्मी पत्याचा जुगार खेळताना व खेळवताना मिळुन आलेले एकुण दहा इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकुण ४१ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला  आहे. सदर ताब्यात घेतलेले दहाजण व एक पाहिजे इसम असे एकुण ११  आरोपी विरुध्द मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे  महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम ४ ( अ ) व ५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांना पुढील कारवाई करीता मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दुसऱ्या कारवाईत बिबवेवाडी परिसरात कल्याण मटका जुगार खेळताना व खेळवताना एकुण सात जणांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकुण दहा हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर सात आरोपी विरुद्ध बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे  गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, अजय राणे, बाबा कर्पे, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे, किशोर मुजबळ, ओंकार कुंभार या पथकाने केली आहे.