पुणे, दि. ०३/०३/२०२३: दुचाकी वेडीवाकडी का चालवतोस असे विचारत दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाकडील रोकड आणि गळयातील सोन्याचा गोफ हिसकावून नेला. ही घटना १ मार्चला रात्री साडेअकराच्या सुमारास वारजे माळवाडीत परिसरात घडली.
याप्रकरणी सोमनाथ बालाजी पांचाळ (वय ३८, रा. वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमनाथ हे १ मार्चला कामावरुन सुटल्यानंतर दुचाकीवरुन घरी निघाले होते. त्यावेळी वारजे पुल परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करुन थांबविले. तु वाकडी तिकडी गाडी का चालवतोस, असे म्हणत एका चोरट्याने सोमनाथच्या खिशातील १ हजार २०० रुपये आणि गळ्यातील ४० हजारांचा सोन्याचा गोफ असा ऐवज हिसकावून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जवळगी तपास करीत आहेत.
More Stories
उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते पुणे मॉडेल स्कूल, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीएमएलकडून जादा बससेवांचा ताफा; १६ ते २० जूनदरम्यान आळंदी-देहू मार्गावर विशेष नियोजन
पुणे: आषाढी वारीतील दिंड्यांना २० हजार रुपये अनुदान; शासन निर्णय जाहीर