पुणे, दि. ०२/०४/२०२३ – दुचाकीवरून घरी चाललेल्या तरुणाला लिफ्ट मागून काही अंतरावर गेल्यावर चाकूच्या धाकाने चोरट्याने दुचाकी, मोबाईल आणि तीन हजारांची रोकड असा ३३ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २७ मार्चला रात्री पावणे नऊच्या सुमारास दिवे घाटातील पहिल्या वळणावर घडली आहे. याप्रकरणी गणेश प्रताप गायकवाड ( वय ३८, रा. बऱ्हाणपूर, बारामती) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा २७ मार्चला दुचाकीवरून घरी चालला होता. रात्री साडे आठच्या सुमारास चोरट्याने त्याला लिफ्ट मागितली. गणेशने त्याला लिफ्ट दिल्यानंतर काही अंतरावर चोरट्याने खिशातून चाकू काढून गणेशला दाखवला. त्याच्याकडील मोबाईल, दुचाकी आणि तीन हजरांची रोकड असा ३३ हजारांचा ऐवज लुटून नेला. गणेशने आरडाओरडा करेपर्यंत चोरटा पसार झाला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस तपास करीत आहेत.
More Stories
पुणे: ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टफोन आणि संगणक प्रशिक्षण
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या दोन महिला तंत्रज्ञांना डांबले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
‘दगडूशेठ’ गणपतीची सांगता मिरवणूक दुपारी ४ वाजता मार्गस्थ