May 20, 2024

पुणे:खराडीत तरुणाचा मोबाइल हिसकाविला

पुणे, दि. २३/०३/२०२३ – दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाच्या हातातील १५ हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. ही घटना २२ मार्चला पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास खराडीत घडली. याप्रकरणी धनंजय लांडगे (वय २३, रा. वाघोली ) याने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी धनंजय २२ मार्चला खराडीत थांबला होता. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याच्याजवळ येउन हातातील १५ हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. धनंजयने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. पोलिस उपनिरीक्षक कुमरे तपास करीत आहेत.