पुणे (दि. ३१ ऑक्टोबर २०२५): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी पुणे शहराच्या वतीने आज निष्क्रिय आणि महिलांचा अपमान करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.
एक महिला असूनही आत्महत्याग्रस्त महिलेबाबत असंवेदनशील आणि अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्याकडून महिला आयोगाचे पद भूषविण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली.
हे आक्रमक आंदोलन धायरी गारमाळ मुख्य रस्त्यावर असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर तसेच धायरी फाटा येथे दोन ठिकाणी एकाच वेळी घेण्यात आले.
या आंदोलनात शिवसेना महिला आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांसह, युवती सेना कार्यकर्त्या आणि शिवसैनिकांनी उत्स्फूर्त आणि आक्रमक सहभाग नोंदवला. “महिला आयोग अध्यक्ष का महिलांचा अवमान आयोग?”, “रुपाली चाकणकर राजीनामा द्या!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
शिवसेना महिला आघाडीच्या रेखा कोंडे म्हणाल्या की,
“महिला आयोग हे महिलांच्या सन्मानासाठी असतं, महिलांचा अपमान करण्यासाठी नव्हे. रूपाली चाकणकर यांनी आपली भूमिका सिद्ध केली आहे त्या महिलांच्या हक्कांची नाही, तर सत्ताधाऱ्यांच्या मुखपत्र आहेत!” त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा.
या आंदोलनाद्वारे शिवसेना महिला आघाडीने स्पष्ट संदेश दिला की,
“महिलांचा अवमान करणाऱ्यांना महिला समाज माफ करणार नाही – आणि शिवसेना शांत बसणार नाही!”
यावेळी ज्योती चांदरे, अमृत पठारे, रेखा कोंडे, स्वाती कथलकर, जयश्री भणगे , विद्या होडे , निकिता मारटकर, सरोज कार्वेकर, सुनिता खंडाळकर, छाया भोसले, स्नेहल पाटोळे , सविता दगडे, अमृता शिंदे, माधुरी तुपे, करुणा घाडगे, वैशाली दारवटकर, मृण्मयी लिमये, विजया मोहिते संगीता नाईक गौरी चव्हाण वर्षा खलसे नेहा कुलकर्णी, नाझ इनामदार, कविता कोंडे, माधवी हेगडे, तसेच अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही