June 24, 2024

पुणे: दुचाकीसह ५ लाखांची रक्कम लांबवली

पुणे, ०५/०८/२०२३: मार्केट यार्ड मधील भुसार बाजार येथून दुचाकीसह ५ लाख ६ हजारांची रक्कम लांबवण्यात आली आहे.

याप्रकरणी ६२ वर्षीय नागरिकाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजवून ४० मिनिटांनी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी मार्केट यार्डतील भुसार बाजार येथील मयूर ट्रेडिंग समोर आपली दुचाकी लावली होती. दुचाकीच्या डिक्कीत ५ लाख ६ हजार ८०० रुपयांची रक्कम ठेवली होती. चोरट्याने रक्ममेसह दुचाकी चोरून नेली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डाबेराव करत आहेत.