पुणे, दि ४/०९/२०२३: खुनाच्या गुन्ह्यातील पॅरोलवर असलेल्या सराईत गुन्हेगाराला ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने पानशेत गावातून अटक केली आहे. रोहित शंकर पासलकर (वय-२३ रा. मुपो रुळे-मोरदरी, ता. वेल्हे, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
खंडणी मागणारा मूळगावी पानशेतला येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार श्रीकांत दराडे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सुनिल तांबे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर पोलीस अंमलदार श्रीकांत दगडे, सुमित ताकपेरे, महेश पाटील, गणेश ढगे यांनी केली.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही