April 22, 2024

पुणे: पर्वती, वारजे माळवाडीत घरफोडी; ५ लाख ५५ हजारांचा ऐवज लंपास

पुणे, दि. २६/०६/२०२३: शहरातील पर्वती आणि वारजे माळवाडीत चोरट्यांनी ५ लाख ५५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी दत्तवाडी आणि वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भरसकाळी घरात शिरुन चोरट्यांनी ३ लाख ६६ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना १ ते २० मे कालावधीत पर्वती परिसरात घडली आहे. याप्रकरणी पांडुरंग आधवडे (वय ५०, रा. लक्ष्मीनगर, पर्वती ) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चोरट्यांनी आधवडे यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून दागिन्यांची चोरी केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक डोंगरे तपास करीत आहेत.

वारजेतील सहयोगनगर आणि गोकुळनगरमध्ये चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून २ लाखांची चोरी केली आहे. याप्रकरणी महिलेने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रणजित सहाणी वय ५४ हे सहयोनगरमध्ये राहायला असून २४ ते २५ जूनला चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून १ लाख ३४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. त्याच परिसरात गोकुळनगरमध्ये राहणारे भोंदू नारायण करंदोळकर (वय ५६) यांच्याही घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक मुंढे तपास करीत आहेत.