पुणे, २६/०४/२०२३: एकतर्फी प्रेमास १८ वर्षीय तरुणी प्रतिसाद देत नसल्याने तसेच मुलीबरोबर बोलायचे नाही, तिला त्रास देऊ नको, असे तिच्या पालकांनी सांगितल्याने एका तरुणाने तरुणी राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये जाऊन तिच्या दुचाकीसह तीन गाड्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून ती जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणासह दोघांवर गुन्हा दाखल करून एका आरोपीस जेरबंद केले आहे.
याप्रकरणी लोहगावमधील एका तरुणीच्या वडिलांनी विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी श्रीराम घाडगे (रा. वाघोली,पुणे) व त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खांदवेनगर येथे सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मुलगी व आरोपी श्रीराम घाडगे हे विमाननगर परिसरात एका कॉलेजमध्ये शिकत आहे.श्रीराम याने तरुणीला एकतर्फी प्रेमातून माझ्यासोबर बोलत जा असे म्हणून तिला सतत त्रास देत होता. तिने ही गोष्ट तिच्या वडिलांना सांगितले.
तेव्हा त्यांनी आरोपी श्रीराम घाडगे याला तिला तुझ्यासोबत बोलायचे नाही. उगाच त्रास देऊ नको, असे सांगितले.
त्याचा राग मनात धरुन त्याने एका साथीदाराला सोबत घेतले.सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तक्रारदार यांचे पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीला थेट आग लावली.
त्यात त्यांच्या शेजारी असलेल्या आणखी दोन दुचाकींनाही आग लागून त्यांचे नुकसान झाले आहे. पोलीस हवालदार एस धेंडे याबाबत पुढील तपास करीत आहेत.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.