पुणे दि. ०२/०३/२०२३: पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता ए.बी. सी. फार्म चौक ते ताडीगुत्ता मार्गे जहांगीर नगर व ए.बी.सी. फार्म चौक ते ताडीगुत्ता मार्गे केशवनगर या मार्गावरील सकाळी ७.०० ते ११.०० व सायंकाळी १७.०० ते २१.०० या वेळेत जड वाहनास बंदी करण्यात येणार आहे.
वाहतूक बदलाबाबत नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास त्या पोलीस उप आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात १२ मार्च पर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात.
नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे उप आयुक्त वाहतूक पुणे शहर यांनी कळविले आहे.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन