म्हाळुंगे, २० फेब्रुवारी २०२५: पुण्यातील बालेवाडी जवळील म्हाळुंगे येथील इक्वीलाईफ होम्स सोसायटी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. या सोहळ्यात सोसायटीमधील रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘पाळणा’ गीताच्या सुमधुर गायनाने केली. विशेष आकर्षण ठरले राज्याभिषेक सोहळ्यावर सादर केलेले नयनरम्य नृत्य, ज्यामध्ये 40 हून अधिक मुलांनी भाग घेतला. लहान बालगोपाळांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषेत साजरे करत उपस्थितांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बाबुराव चांदेरे (माजी नगरसेवक, पुणे मनपा) यांची उपस्थिती होती. तसेच समीर चांदेरे, मनोज पाडळे, समीर कोळेकर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती बाबुराव आप्पा चांदोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आली, ज्यामुळे वातावरण अधिक भक्तिमय झाले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अनिरुद्धजी काळे, अभिजीत साळी, अभिजीत चौगुले, आकाश बिराजदार आणि शुभम बाभरे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शिवभक्तांसाठी महाप्रसाद वितरणाचे आयोजन विनोद कोणे (विजय केटरर्स) यांच्या वतीने करण्यात आले.
या भव्य आणि उत्साही सोहळ्यामुळे संपूर्ण सोसायटीत शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी