July 27, 2024

पुणे: अपघातत ठार करणारा कंटेनरचालक अटकेत, शिवाजीनगर पोलीसांकडून गुन्हा उघडकीस

 पुणे, दि. १६/०३/२०२३- पोलिस भरतीसाठी मुलीला घेउन पुण्यात आलेल्या वडिलांना धडक देउन ठार करणार्‍या कंटेनगरचालकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. हा अपघात १३ मार्चला घडला होता. अंकुश राजेंद्र राख (रा- मु. हाजीपुर पो. ब्रम्हागांव ता. आष्टी जि. बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सुरेश सखाराम गवळी (वय ५३  रा. नाशिक ) असे ठार झालेल्याचे नाव आहे.

पोलिस भरतीच्या परिक्षेसाठी सुरेश गवळी मुलीला घेउन पुण्यात आले होते. त्यावेळी १३ मार्चला रस्ता ओलंडत असताना भरधाव कंटेनर चालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्याने सुरेशचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत होता. एपीआय भोलेनाथ अहिवळे आणि पथकाने घटनास्थळावर जाउन तपास केला. हवालदार रणजित फडतरे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सातत्यपूर्ण तपास करून  वाहनाची माहिती मिळविली.

संबंधित वाहन जालानामधील असून १६ मार्चला वाघोली परिसरात येणार असल्याची माहिती एपीआय भोलेनाथ अहिवळे, रणजित फडतरे  अतुल साठे यांना मिळाली. पथकाने वाघोली परिसरात सापळा रचून  चालक राखला ताब्यात घेतले. ही कामगिरी उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, एसीपी गजानन टोम्पे,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने  एपीआय भोलेनाथ अहिवळे,  उप निरिक्षक अर्जुन नाईकवाडे,   उपनिरिक्षक विशाल शिंदे,  रणजित फडतरे, अतुल साठे, बशीर सय्यद, शिवा कांबळे, प्रविण राजपुत, अविनाश भिवरे, गणपत वाळकोळी, यांनी  केली.