पुणे, 4 मार्च 2026: पुणे जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित अशा सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल २०२६ स्पर्धेत साखळी फेरीत सीएमएस फाल्कन्स अ, परशुरामियन्स एससी अ, स्निग्मय पुणे फुटबॉल क्लब अ, जीओजी एफसी अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
बावधन येथील हॉटफूट फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सलामीच्या लढतीत सीएमएस फाल्कन्स अ संघाने चेतक फुटबॉल क्लब अ संघाचा 4-1 असा पराभव करून विजयी सलामी दिली. विजयी संघाकडून सौरव यादव(2,14 मि.) याने दोन गोल, तर ऋग्वेद येवले(42मि.), शिबू सनी(50 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
दुसऱ्या सामन्यात गौरव स्वामीनाथन(5,7,20,39,52 मि.) याने नोंदवलेल्या पाच गोलांच्या जोरावर परशुरामियन्स एससी अ संघाने डेक्कन इलेव्हन एफसी अ संघाचा 5-1 असा सनसनाटी पराभव करून शानदार सुरुवात केली. अन्य लढतीत स्निग्मय पुणे फुटबॉल क्लब अ संघाने दिएगो ज्युनियर्स संघाचा 9-1 असा धुव्वा उडवला. स्निग्मय पुणे फुटबॉल क्लब अ संघाकडून मेहेदी हसन(2,7,29,46मि.) याने चार गोल, सचिन चंदेल(10मि.), श्रेयश चौगुले(14मि.), सुदीप सुरेंद्रन(26मि.), आदर्श माचे(42मि.), अबिन ऑगस्टिन(53मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. चुरशीच्या लढतीत जीओजी एफसी अ संघाने इंद्रायणी स्पोर्ट्स क्लबचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला. जीओजी एफसी अ संघाकडून सतीश हवालदार(10मि.), सुमित भंडारी(25मि.), राहुल कडलग(38मि.) यांनी एक गोल केला. तर, इंद्रायणी स्पोर्ट्स क्लबकडून जगथ राज(19,50मि.) याने दोन गोल केले.
याआधी स्पर्धेचे उदघाटन पीडीएफएचे अध्यक्ष प्यारेलाल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीएफएचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय चौधरी, मंगेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: साखळी फेरी:
सीएमएस फाल्कन्स अ: 4(सौरव यादव 2, 14 मि., ऋग्वेद येवले 42 मि., शिबू सनी 50 मि.)वि.वि.चेतक फुटबॉल क्लब अ: 1(अथर्व शिंदे 12 मि);
परशुरामियन्स एससी अ: 5(गौरव स्वामीनाथन 5,7,20,39,52 मि.)वि.वि.डेक्कन इलेव्हन एफसी अ: 1(बलराज जगताप 52 मि.);
जीओजी एफसी अ: 3 (सतीश हवालदार 10 मि., सुमित भंडारी 25 मि., राहुल कडलग 38 मि.) वि.वि.इंद्रायणी स्पोर्ट्स क्लब: 2(जगथ राज 19, 50 मि.);
स्निग्मय पुणे फुटबॉल क्लब अ: 9 (मेहेदी हसन 2,7,29,46 मि., सचिन चंदेल 10 मि., श्रेयश चौगुले 14 मि., सुदीप सुरेंद्रन 26 मि., आदर्श माचे 42 मि., अबिन ऑगस्टिन 53 मि.)वि.वि.दिएगो ज्युनियर्स: 1(अॅलन बिनॉय 15 मि.).

More Stories
पहिल्या पीवायसी- पुसाळकर फाउंडेशन पिकलबॉल साखळी स्पर्धेत गरगंटू डिस्ट्रॉयर्स, के-प्रा पिकलर्स संघांची विजयी सलामी
रुग्ण हक्क परिषदेच्या अध्यक्षपदी उमेश चव्हाण यांची फेरनिवड
पहिल्या पीवायसी- पुसाळकर फाउंडेशन पिकलबॉल साखळी स्पर्धेत एकुण 204 खेळाडू सहभागी