June 14, 2024

पुणे: दुचाकीची धडक बसल्याने चालकाला मारहाण, दुचाकी चोरणार्‍याला अटक

पुणे, दि. २०/०७/२०२३: दुचाकीस्वारासमोर अचानकपणे उभे राहिल्यामुळे धडक बसून खाली पडल्याचा राग आल्यामुळे चोरट्याने एकाची दुचाकी चोरून नेली. ही घटना १४ जुलैला कॅम्प परिसरात घडली आहे. याप्रकरणी चोरट्याला अटक केली आहे.

मनोज रतनचंद दोशी (वय ५१, रा. रास्ता पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जलाराम सुतार (वय ४८, रा. दत्तनगर आंबेगाव रोड) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जलाराम हे १४ जुलैला कॅम्प परिसरातून दुचाकीवर जात होते. त्यावेळी अचानकपणे मनोज त्याच्यासमोर उभा राहिला. त्यामुळे धडक बसून खाली पडल्याचा राग आल्यामुळे मनोजने जलारामला मारहाण करून ८० हजारांची दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.