September 17, 2024

पुणे: दुर्गा एसएचा सहज विजय; संगम यंग बॉईज, एनडीए युथ स्पोर्ट्स क्लबचा संघर्षपूर्ण विजय

पुणे ११ मे २०२३ – द्वितीय-तृतीय श्रेणी गटातील संघाच्या सुरु असलेल्या अॅस्पायर चषक २०२३ स्पर्धेत दुर्गा एस.ए. संघाने सहज विजयासह आपली आगेकूच कायम राखली. त्याच वेळी संगम यंग बॉईज आणि एनडीए युथ स्पोर्ट्स क्लबला विजयासाठी संघर्ष करावा लागला.
पिंपरी येथिल डॉ. हेडगेवार मैदानावर गुरुवारी झालेल्या सामन्यात संगम यंग बॉईज संघाने दोन्ही सत्रात एकेक गोल करताना हायलायडर्स एफसी संघाचे आव्हान २-० असे मोडून काढले. साहिल कदमने पूर्वार्धात २०व्या, विपुल गोफनेने उत्तरार्धात ४५व्या मिनिटाला गोल केला.
दुसऱ्या सामन्यात दुर्गा स्पोर्टस अकादमी संघाने धीरज मानेच्या दोन गोलच्या जोरावर डिएगो ज्युनिअर्स एफसीए संघावर ४-० असा मोठा विजय मिळविला. मयुर वाघिरेने १०व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर नेल्स पास्तेने २३व्या मिनिटाला दुसरा गोल करून आघाडी वाढवली. उत्तरार्धात धीरजने ३८ आणि ४९व्या मिनिटाला गोल करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
अन्य एका सामन्यात एनडीए युथ स्पोर्ट्स क्लब संघाला पीसीएच लायन्स संघाविरुद्ध विजयासाठी शूट-आऊटची वाट बघावी लागली. नियोजित वेळेतील १-१ अशा बरोबरीनंतर एनडीए संघाने ४-३ असा विजय मिळविला.
संदीप सिंगने १०व्या मिनिटाला एनडीए संघाला आघाडीवर नेले, तर विकास सिंगने १६व्या मिनिटाला पीसीएच संघाला बरोबरी साधून दिली.  त्यानंतर शूट आऊटमध्ये एनडीएसाठी संदीप सिंग, दिनेश माने, सकलेंबा ए., अजेश सीए यांनी गोल केले. पराभूत संघाकडून आकाश पोखरकर, सदानंद स्वामी आणि वैभव चौले यांनाच गोल करता आले.
निकाल –
संगम यंग बॉईज २ (साहिल कदम २०वे मिनिट, विपुल गोफाने ४५वे मिनिट) वि.वि. हायलॅंडर्स एफसी ०
दुर्गा एस.ए. ४ (मयुर वाघिरे १०वे मिनिट, नेल्सन पास्ते २३वे मिनिट, धीरज माने ३८, ४९वे मिनिट) वि.वि. डिएगो ज्युनियर्स एफसीए ०
एनडीए युथ स्पोर्टस क्लब १ (४) (संदीप सिंग ११वे मिनिट, संदीप सिंग, दिनेश माने, सकलेम्बा ए., अजेश सीए) वि.वि. पीसीएच लायन्स एस.सी. १ (३) (विकास सिंग १६वे मिनिट, आकाश पोखरकर, सदानंद स्वामी, वैभव चौले)