July 25, 2024

पुणे: आठ वर्षीय मुलाला धमकावून दोन महिने अत्याचार, दत्तवाडी पोलिसांकडून तिघांना अटक

पुणे, दि. ०३/०४/२०२३: आठ वर्षीय मुलाला धमकावून त्याच्यावर दोन महिने अत्याचार केल्याची  घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी  दत्तवाडी पोलिसांनी तिघांना अटक केली. आरोपींविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये   गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष उर्फ पक्या प्रकाश शिंदे (वय २१), हेमंत उर्फ हेम्या महेश माळवे (वय १९), किरण सुरेश सावंत (वय २५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडीत मुलाच्या वडिलांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आणि आरोपी एकाच परिसरात राहायला आहेत. दोन महिन्यांपुर्वी आरोपींनी  मुलाला अश्लील ध्वनीचित्रफित दाखवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. आरोपी किरण सावंतने मोबाइलवर चित्रीकरण केले. त्यानंतर अल्पवयीन मुलाला धमकावून आरोपींनी ध्वनीचित्रफित नातेवाईकांना दाखविण्याची धमकी देऊन त्याच्यावर दोन महिने अत्याचार केले.

या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास जीवे मारुन टाकू, अशी धमकी दिली. घाबरलेल्या मुलाने याबाबतची माहिती वडिलांना दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली.