November 11, 2024

पुणे: द्रुतगती मार्गावर साेमाटणे परिसरात मोटारीचा भीषण अपघात, सुरक्षा दुभाजकाचा जाड पत्रा मोटारीत शिरला

लोणावळा, १८/०३/२०२३: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमाटणे परिसरात शनिवारी सकाळी मोटारीचा भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या सुरक्षा दुभाजकाचा जाड पत्रा माेटारीत आरपार शिरला. दैव बलवत्तर होते म्हणून अपघातात जीवीतहानी झाली नाही. अपघातात एक जण जखमी झाला.

द्रुतगती मार्गावरुन मुंबईहून पुण्याकडे भरधाव मोटार सकाळी साडेसातच्या सुमाास निघाली निघाली होती. त्या वेळी मोटारचालकाचे नियंत्रण सुटले आणि मोटार रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या सुरक्षा दुभाजकावर आदळली. दुभाजकाचा पत्रा तुटून तो थेट मोटारीत शिरला. पत्रा मोटारीतून आरपार झाले. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी झआली नाही. अपघातात मोटारीतील एक जण जखमी झाला असून त्याच्यावर सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी (१७ मार्च) द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्याजवळ टायर खराब झाल्याने कोळशाची वाहतूक करणारा मालवाहू ट्रक थांबला होता. त्या वेळी सेवा रस्त्यावर थांबलेल्या ट्रकवर भरधाव मोटार आदळून मोटारीतील तिघांचा जागीत मृत्यू झाला होता.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अतिवेगामुळे गंभीर अपघात होतात. गंभीर अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलीस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उपाययोजना केल्या आहेत. वेगमर्याद ताशी ८० ते ११० किलोमीटर निश्चित करण्यात आली आहे. वेगमर्यादा धुडकावल्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडले आहेत. गेल्या दोन दिवसात द्रुतगती मार्गावर झालेले अपघात भरधाव वेगामुळे झाले आहेत.