हडपसर, १४/०३/२०२३: मुलगा वारंवार आजारी असल्याने कोणताही काम धंदा करत नसल्याने पित्याने त्याचा गळा दाबून खून केला तर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पित्याला हडपसर पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.
अभिजीत बाबुराव जायभाय (28 रा. तुकाई दर्शन, काळेपडळ, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या खून प्रकरणी बाबुराव दिनकर जायभाय (50) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत त्याची पत्नी सुनीता यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित, त्याची आई आणि वडील हे तुकाईदर्शन येथे भाडेतत्त्वावर राहण्यास होते. अभिजीतची आई धुणे भांडी तर आरोपी पिता बाबुराव हा हमालीची कामे करत होता. अभिजित हा वारंवार आजारी असल्याने व काहीही कामधंदा करत नव्हता. त्याच्या उपचाराचा खर्च करणे होत नसल्याने गुरुवारी (दि.13) दुपारी साडेबाराच्या सुमारास तो घरातील दिवानवर झोपलेला असताना आरोपी बाबुराव याने त्याचा गळा दाबून खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे आणि विश्वास डगळे, युनिट 5चे निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.