October 14, 2024

पुणे: हडपसर येथेभाजी मंडईला आग, ९० स्टाॅलचे नुकसान

पुणे, २१ फेब्रुवारी २०२३ : हडपसर – हांडेवाडी रस्त्यावरील चिंतामणी नगर येथील भाजी मंडईला मध्यरात्री १२. ३० च्या सुमारास
मध्ये आग लागल्याने ९० स्टाॅल जळून खाक झाले. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच काळेबोराटे नगर हडपसर व कोंढवा बुद्रुक येथून एकुण तीन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती. सणांनीही आग अटकत आली यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
चिंतामणी नगर येथील भाजी मंडईला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. तेथे आग मोठी असल्याने आणखीन आग्नीशामक दलाचे बंब मागविण्यात आले. जवानांनी तातडीने चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला व त्याठिकाणी कोणी इसम नसल्याची खाञी केली. जवानांनी २५ मिनिटात आग पुर्ण आटोक्यात आणत कुलिंग करुन आग पुर्ण विझवत धोका दूर केला.
त्याठिकाणी छोटे भाजी विक्रीकरिता असणारे अंदाजे ९० स्टॉल असून जवळपास सर्व स्टॉलचे आणि त्यामध्ये असणारया भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तिथे असणारे दोन टेम्पो ही जळाले आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे तसेच तांडेल विलास दडस व जवान अनिमिष कोंडगेकर, चंद्रकांत नवले, बाबा चव्हाण, दशरथ माळवदकर, विशाल यादव, प्रकाश शेलार यांनी सहभाग घेतला.