पुणे, २६/०९/२०२५: आज दिनांक २६\०९\२०२५ रोजी दुपारी ०२•३० वाजता उंड्री, जगदंब भवन मार्ग येथील मार्वल आयडियल सोसायटी या चौदा मजली इमारतीत बाराव्या मजल्यावर ‘विंग एफ’ क्रमांक १२०१ या सदनिकेत मोठ्या प्रमाणात आग लागली असता अग्निशमन दलाकडून तातडीने पाच अग्निशमन वाहने, एक बी ए सेट व्हॅन, दोन टँकर एक उंच शिडीचे वाहन आणि शासकीय रुग्णवाहिका क्रमांक १०८ रवाना करण्यात आले होते.
जवान घटनास्थळी पोहोचताच आगीचे रौद्र रुप व धुर पाहताच होज पाईप वर नेत आग विझवण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला व त्याचवेळी कोणी अडकले आहे का याची खाञी करीत असताना अचानक स्वयंपाक घरातील दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने 3 स्थानिक व अग्निशमन दलाचे 2 जवान जखमी झाले. आग विझवत आत घरात प्रवेश केला तेव्हा एका मुलाला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाभरात आग इतरञ पसरु न देता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
या आगीमध्ये संपूर्ण सदनिका जळाली आहे. दुर्दैवाने या आगीत एका पंधरा वर्ष वयाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मृत मुलगा तर्ष कमल खेतन आणि जखमी अग्निशमन जवान विश्वजीत वाघ, पृथ्वीराज खेडकर असे आहे.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही