पुणे, २४/०३/२०२३: जिममधील सेल्सपर्सनला लुटणार्या चौघा चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी चोवीस तासाच्या आत बेड्या ठोकल्या. चोरट्यांनी एक लाख रुपये किंमतीची केटीएम दुचाकी, 50 हजार रुपये किंमतीचा मोबाईल,25 हजार रुपयांचे आयपॅड असा पावने दोन लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला होता.
हर्षद अंकुश शेळके (वय.19), सौरभ संजय चव्हाण (वय.23), राहुल खुशीयाल सारसर (वय.19,रा. कमेला झोपडपट्टी साळुंखे विहार रोड कोंढवा), अनुराग गौतम बद्रीके (वय.19,रा. खडकी) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यातील अनुराग आणि राहुल हे सराईत गुन्हेगार आहेत.
याबाबत धर्मेश मनोहर नानी (वय.27,रा.विष्णू विहार सोसायटी बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ही घटना बुधवारी (दि.22) मार्च रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास मालधक्का चौकात घडली होती.
फिर्यादी नानी हे त्यांच्या दुचाकीवरून मालधक्का चौकात ते आले असताना, आरोपींनी त्यांच्या दुचाकीने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यावेळी ते रस्त्यावर खाली पडले असता, आरोपींनी तु मध्ये गाडी का थांबवली असे म्हणून त्यांना मारहाण केली. त्यामध्ये नानी हे जखमी झाले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांची दुचाकी व इतर ऐवज जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. हा प्रकार घडल्यानंतर नानी यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. संबधीत गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलिसांनी माहिती मिळाली की, हा गुन्हा कोंढवा व खडकी येथील संशयित आरोपींनी केला आहे. तांत्रिकविश्लेषन व सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी चौघांचा माग काढून त्यांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशी त्यांनी गुन्ह्याची कुबूली दिली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, गुन्हे निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, कर्मचारी शिवाजी सरक, अनिल कुसाळकर, सागर घोरपडे यांनी केली.

More Stories
Pune: पीएमपीएमएल कडून बसस्थानकांचे विद्रुपीकरण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई
पुणे महापालिकेचे आरक्षण जाहीर अनेक प्रभाग उडाले तर महिला सुरक्षित
Pune: आरपीआयच्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी हिमाली कांबळे यांची निवड