October 14, 2025

पुणे: मनसे तर्फे महिला भगिनींसाठी ‘छावा’ सिनेमा मोफत

पुणे, २०/०२/२०२५: छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित नुकतच छावा हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झालं आहे.अतिशय मोठ्या प्रमाणावर या चित्रपटाला पसंती मिळताना पाहायला मिळत आहे.अश्यातच पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रल्हाद गवळी यांच्याकडून शिवजयंतीच्या निमित्ताने महिलांना मोफत छावा चित्रपट दाखविण्यात आलं आहे.

देशभरात काल मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.त्यातच काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा हिंदी सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सिनेमागृहात शिवभक्त आणि शिवप्रेमींनीओठी गर्दी केली असून या सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.अश्यातच आज मनसेचे प्रल्हाद गवळी यांच्याकडून महिला भगिनींना छावा सिनेमा मोफत दाखवण्यात आला आहे. आज सकाळी लाल महाल येथे पारंपरिक वेशभूषेत शिवभक्तांनी हजेरी लावली असून महिलांनीही डोक्यावर भगवे फेटे परिधान करुन छावा सिनेमा पाहण्यासाठी उपस्थिती दर्शवली.लालमहालपासून ते चित्रपट गृहापर्यंत मिरवणूक काढत शिवभक्तांनी छावा सिनेमा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.

अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदना या दोघांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असून हा चित्रपट पाहून सर्व प्रेक्षक भावूक होताना दिसत आहेत. छावा सिनेमाने 4 दिवसांत 150 कोटींचा आकडा गाठला असून बॉक्स ऑफिससह बॉलिवूडमध्येही धुमाकूळ घातला आहे. त्यातच, शिवजयंतीच्या निमित्तानेही सिनेमागृह हाऊसफुल्ल असून छावा सिनेमा पाहून शिवभक्तांकडून शिवजंयती साजरी केली जात गेली.