पुणे , दि. ५/०६/२०२३: किराणा माल दुकानात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची बेकायदा विक्री करणे जिवावर बेतले असून, गॅसगळतीमुळे गंभीर भाजलेल्या १५ वर्षीय मुलीचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. दुर्घटनेत किराणा माल दुकानदारासह त्याची लहान मुलगी गंभीर भाजले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी भागात घडली
गीता मन्नाराम चौधरी (वय १५, रा. प्रेम सुपर मार्केट, माळवाडी, किरकटवाडी, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. तिचे वडील मन्नाराम चौधरी (वय ४५) आणि लहान बहिणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चौधरी यांचे किरकटवाडी भागातील माळवाडी येथे किराणा माल विक्रीचे दुकान आहे. किराणा माल दुकानात ते स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची बेकायदा विक्री करत होते. मोठ्या गॅस सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरण्यासाठी त्यांनी एक गोदाम भाड्याने घेतले होते. त्या ठिकाणी चौधरी बेकायदारीत्या गॅस भरायचे. गुरुवारी (१ जून) सकाळी गॅस भरत असताना गळती झाली आणि आगीचा भडका उडाला. आगीत चौधरी आणि त्यांच्या दोन मुली गंभीर होरपळल्या. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससून रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी (५ जून) गीताचा मृत्यू झाला. चौधरी आणि त्यांच्या लहान मुलीची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.