September 10, 2024

पुणे: आयटी ऑफीसर अडकला सेक्स्टॉर्शनमध्ये 10 लाख 42 लाखांची फसवणूक

पुणे, २०/०६/२०२३: आयटी ऑफीसर म्हणून नोकरी करत असलेल्या तरूणाला सेक्सटॉर्शन जाळ्यात अडकवून तब्बल 10 लाख 42 हजार रूपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही रक्कम सायबर पोलिस आयुक्ताच्या नावाने उकळल्याचा प्रकारही तक्रारीतून समोर आला आहे.याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारक महिला आणि मोबाईलधारक बोगस सायबर कमिशनर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 33 वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हा एका सराफी पेढीमध्ये आयटी ऑफीसर म्हणून काम करतो. त्याला फेब्रुवारी 2022 मध्ये विवस्त्र अवस्थेत असलेल्या महिलेनी व्हिडीओ कॉल केला. कॉल दरम्यान महिलेनी स्क्रिनशॉट काढले. नंतर तरूणाला तिने स्क्रिनशॉट काढलेले फोटो पाठवून ते नातेवाईक, मित्रांमध्ये व्हायरल करण्याची धमकी दिली. ते थांबविण्यासाठी तिने तब्बल 39 लाख रूपये ऑनलाईन घेतले. यानंतर तरूणला सायबर पोलिस आयुक्त श्रीवास्तव नावाने एक फोन आला. त्याने देखील संबंधीत स्क्रिनशॉट आणि युट्युबवर अपलोड झालेल्या व्हिडीओतील मुलीला मी पकडतो असे सांगितले. परंतु, युट्युबवर अपलोड झालेल्या व्हिडीओसाठी फाईन भरावा लागेल म्हणून त्याने वेळोवेळी तरूणाकडून तब्बल 3 लाख 28 हजार उकळले.
त्यानंतर पुन्हा श्रीवास्तव नावाने त्याला फोन आला. त्याने पोलिसांना तपासासाठी पैशाची आवश्यकता असते म्हणत पुन्हा पैशाची मागणी केली. त्यावर तरूणाने त्याला 2 लाख 60 हजार पाठवले. तर मे 2022 मध्ये राहुल शर्मा नावाने फोन करून तुम्ही आम्हला 1 लाख 73 हजार 180 रूपये जास्त पाठविले आहेत, ते मी तुम्हाला परत पाठवतो म्हणत तरूणालाच पैसे पाठविण्यास सांगितले. तरूणानेही संबधीत व्यक्तीला बळी पडून 4 लाख 27 हजार रूपये पाठविले. दरम्यान नंतर तरूणाला 14 मे रोजी सायंकाळी पुन्हा फोन आला ज्या मुलीने व्हिडीओ पाठविला आहे त्या मुलीने आत्महत्या केली असून तुम्हाला तिच्या नातेवाईकांना पैसे द्यावे लागतील म्हणून फोन आला. त्यावर तरूणाला आपली फसवणूक केली जात असल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने पोलिस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली.