पुणे, १८ फेब्रुवारी २०२५: महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद मिळावी यासाठी आमदार यांच्यासह सर्वच पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनी ५० ते १०० कोटींच्या कामाच्या याद्या दिल्या आहेत.महापालिका प्रशासनाच्या सुसंगत असणार्या कामांनाच प्राधान्य देणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, पुण्यातील आमदारांच्या विधानसभा निहाय याद्या महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. अंदाजपत्रकात तरतुद मिळावी यासाठी आपण आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीमधून सुध्दा आपल्याला निधीचे घबाड मिळणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे आता विरोधक सुध्दा आक्रमक झाले आहे.
महापालिकेचे अंदाजपत्रक हे नागरिकांचे असावे, ती विशिष्ट पक्षाचे असू नये असे झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिला आहे
याविषयी महापालिका आयुक्त भोसले म्हणाले, महापालिका प्रशासन सन २०२५- २६ च्या अंदाजपत्रकावर काम करत आहे. अंदाजपत्रकामध्ये तरतूद मिळावी यासाठी सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात. यासाठी ५० ते १०० कोटींची तरतूद अंदाजपत्रकात मिळावी यासाठी याद्या आल्या आहेत. सर्वांच्याच याद्या माझ्याकडे आल्या आहेत. महापालिकेचे अंदाजपत्रक पाहता निधी देण्यावर मर्यादा आहे. महापालिका प्रशासनाच्या कामाशी सुसंगत असणार्या कामांना प्रशासन प्राधान्य देणार आहे.
भोसले म्हणाले, अंदाजपत्रकावर काम करण्यासाठी दोन विभागांच्या बैठका झाल्या आहेत. यामध्ये दोन विभागांच्या कामाची माहिती घेण्यात आली. त्याचबरोबर मुख्य लेखापाल यांच्यासोबत एक बैठक झाली आहे. अंदाजपत्रक तयार करत असताना कोणाचाही दबाव नाही. महापालिका प्रशासन आवश्यक्तेनुसार कामाच्या तरतूदी करणार आहे,
“कामांच्या यादी मोठ्या असल्या तरी महापालिकेचे अंदाजपत्र पाहता कोणती तरतूद करायची हे संबंधित विभागाच्या म्हणण्यानुसार ठरणार आहे. त्यामुळे याद्या दिल्या म्हणजे तरतूद झाली असे नाही. अंदाजपत्रलकाला सुध्दा काही मर्यादा आहेत. या अंदाजपत्रकामध्ये विकास भुसंपादनाला प्रधान्य देण्यात येणार आहे.” – डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी