पुणे, २३/१०/२०२३: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सर्व पास केंद्रावरून विविध प्रकारच्या पासेसची विक्री केली जाते. परिवहन महामंडळास महिन्याला पास विक्रीतून सरासरी ५ कोटी रुपयाचे उत्पन्न प्राप्त होत असते. तर सरासरी ६० हजार पासची विक्री होत असते. परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या संकल्पनेतून सोमवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ पासुन महामंडळाच्या सर्व ४० पास केंद्रांवर प्रवाशी नागरिकांना पाससाठी क्यू-आर कोडद्वारे पेमेंट करता येणार आहे.
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या शुभहस्ते व परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे मनपा भवन पास केंद्र येथे कॅशलेस सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांच्यासह सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रिय प्रमुख आशा कोटस्थाने, मुख्य प्रबंधक अजय वाजपेयी, शाखा प्रमुख मनोजकुमार सिन्हा, पीएमपीएमएलचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतिश गव्हाणे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी नारायण करडे, वाहतूक नियोजन अधिकारी (आय.टी.) विजय रांजणे, प्र. मुख्य अभियंता निवृत्ती भांडे, पास विभाग प्रमुख विकास मते, खाजगी बस विभाग प्रमुख समीर आत्तार, अपघात विभाग प्रमुख अशोक साबळे, सेंट्रल वर्कशॉपचे प्र. वर्क्स मॅनेजर राजकुमार माने, पुणे स्टेशन डेपो मॅनेजर संजय कुसाळकर, न.ता.वाडी डेपो मॅनेजर संतोष किरवे उपस्थित होते.
या पद्धतीने होणार कॅशलेस पेमेंट
१. पास केंद्रावरील कर्मचाऱ्याकडे ऑनलाईन क्युआर कोडची मागणी करणे.
२. क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करणे.
३. पास केंद्रावरील कर्मचाऱ्याकडून पास प्राप्त करणे.
नवीन पिढी कॅशलेस सुविधेचा जास्त वापर करत आहे. नवीन पिढीला पीएमपीएमएल ने सुरू केलेल्या कॅशलेस सुविधेचा नक्कीच चांगला लाभ होईल. पीएमपीएमएल ने तिकिट व पाससाठी सुरू केलेली कॅशलेस सुविधा नक्कीच स्तुत्य आहे. — विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महानगरपालिका
पीएमपीएमएल च्या पास केंद्रांवर सुरू करण्यात आलेल्या कॅशलेस सुविधेचा वापर जास्तीत जास्त प्रवाशी नागरीकांनी करावा. कॅशलेस सुविधेमुळे कामात सुलभता येऊन काम जलद गतीने होण्यास मदत होते. — सचिन्द्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.
More Stories
भाषिक कौशल्यातून रोजगाराच्या अनेक संधी: प्रो. पराग काळकर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हिंदी दिवस सोहळा आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रम संपन्न
केंद्र सरकारच्या सहकारी संस्थांबाबतच्या नवीन कायद्याची माहिती घेऊन विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्यवसाय उभे करावेत – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील