पुणे, २६/०२/२०२३: लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिची ध्वनीचित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाटील एका कार्यक्रमात वस्त्रे बदलत असताना तिची चोरुन ध्वनीचित्रफित तयार करण्यात आली. त्यानंतर समाजमाध्यमावर संबंधित ध्वनीचित्रफित प्रसारित करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कलाकार गौतमी पाटील एका कार्यक्रमात वस्त्रे बदलत असताना मोबाइल कॅमेऱ्यावरुन ध्वनीचित्रफित काढण्यात आली. आरोपीने समाजमाध्यमावरील दोन खात्यातून ध्वनीचित्रफित प्रसारित केली. तक्रारदार महिला आणि सहकाऱ्यांची ध्वनीचित्रफित प्रसारित करण्याची धमकी समाजमाध्यमातून देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करत आहेत.
More Stories
ऑटोमायजेशनमुळे भाषेचे सौंदर्य आटले; डॉ. सच्चिदानंद जोशी यांचे प्रतिपादन
महिनाभरात ३२ हजार ७७५ वाहनधारकांवर कारवाई २ कोटी ७२ लाख रुपये दंड आकारणी
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन