November 11, 2024

पुणे: लेशपाल जवळगे आणि दिनेश मडवी यांना माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या वतीने २५००० रोख बक्षीस

पुणे, २८/०६/२०२३:काल सदाशिव पेठे मध्ये तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी च्या तावडीतून त्या तरुणीची सुटका करून तिचा जीव वाचवणारे लेशपाल जवळगे आणि दिनेश मडवी यांच्या धाडसाचे कौतुक करत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष कसबा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांनी २५००० रुपये रोख बक्षीस दिले संकल्प मंगल कार्यलय येथे झालेल्या कार्यक्रमात हे बक्षीस देण्यात आले

या कार्यक्रमाला मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे ,माजी सभागृह नेते धीरज घाटे ,पुणे शहर सरचिटणीस राजेश येनपुरे मतदारसंघाचे सरचिटणीस राजेंद्र काकडे ,छगन बुलाखे,अमित कंक अश्विनी पांडे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

या वेळी बोलताना रासने म्हणाले की सदाशिव पेठेतील घटना ही सर्वांना विचार करायला लावणारी घटना आहे एकीकडे माथेफिरू तरुण हातात कोयता घेऊन पळत असताना त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्या जवळगे आणि मडावी यांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घेण्याची गरज आहे.