पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२५: महावितरणच्या नगररोड विभाग अंतर्गत धानोरी शाखा कार्यालयाचे विभाजन करून नवीन लोहगाव शाखा कार्यालयाची व नवीन १८ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. नवीन वास्तुसह लोहगाव शाखा कार्यालय मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नुकतेच कार्यान्वित करण्यात आले.
वाढत्या नागरीकरणामुळे महावितरणकडून धानोरी व लोहगावसाठी स्वतंत्र शाखा कार्यालय सुरू झाले असून या दोन्ही कार्यालयांमुळे व वाढलेल्या तांत्रिक मनुष्यबळामुळे सुमारे ६९ हजार वीजग्राहकांना आणखी दर्जेदार वीजसेवा मिळणार आहे.

More Stories
पुना क्लब बिलियर्ड्स व स्नूकर लीग स्पर्धा रॉकेट्स, मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स, मनीषा रॉयल्स संघांची विजयी सलामी
पुण्यात “दुसरी दिवाली व्हीटीपी वाली २०२५” या भव्य गृहखरेदी महोत्सवाला सुरुवात!
Pune: पदवीधर व शिक्षक मतदार याद्यांमध्ये नाव नोंदविण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे आवाहन