पुणे, 20/10/2025: काल शनिवार वाडा येथे मुस्लिम महिलांकडून नमाज पठणच्या व्हिडीओ व्हायरल नंतर खासदार मेधा कुलकर्णी आणि पतित पावन संघटनेच्या वतीने शनिवार वाडा येथे आक्रमक आंदोलन करत शनिवार वाडा पटांगणात असलेली मजार काढण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याच शनिवार वाड्यात आंदोलन करत पक्षाच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
शनिवार वाडा येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व धर्मीय लोकांच्या उपस्थितीत खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावं यामागणीसाठी आंदोलन करण्यात आलं.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर जोरदार टिका केली.
यावेळी रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की काल दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी इथ येऊन जी स्टँडबाजी केली तसेच त्यांनी जे बेकायदेशीर कृत्य केलं तसेच सणासुदीच्या दिवसांत हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचं जो प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावं यामागणीसाठी आज आम्ही आंदोलन केलं आहे.हा शनिवार वाडा मराठा सम्राट पेशवे यांचा मुख्यालय होता आणि ही मजार १९३६ मध्ये पुरातत्व विभागाने नोंद केलेली आहे.पुण्यात अनेक वर्षापासून हिंदू,मुस्लिम, शिख,तसेच विविध धर्मीय राहत असून ते वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे.मेधा ताई तुमच्या बापाचा हा शनिवार वाडा नसून आमच्या बापाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं आहे.पोलिसांना विनंती आहे की तुम्ही जर खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल नाही केलं तर मेधा ताई सह पोलिसांना कोर्टात खेचू अस यावेळी त्या म्हणाल्या.
More Stories
Pune: जैन बोर्डिंग जागा विक्रीव्यवहार प्रकरणाला जैसे थे ठेवण्याचे आदेश
Pune: पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ रंगणार २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान
Pune: जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीला जैन समाजाचा विरोध