मुंबई, दिनांक २३/०५/२०२३: सिंदखेडाराजा येथील पळसखेडी चक्का गावाजवळ आज सकाळी पुणे ते मेहकर एसटी बस आणि कंटेनर ट्रकच्या झालेल्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.
या दुर्घटनेत आत्तापर्यंत सहा जण मृत्युमुखी पडले असून दहा जखमी आहेत.
मृतांच्या वारसांना एसटी महामंडळातर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये तत्काळ द्यावेत तसेच जखमी प्रवाशांना योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
या अपघाताविषयी कळताच मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाकडून माहिती घेतली तसेच प्रशासनाने प्रवाशांना व त्यांच्या नातेवाइकांना मदत करण्याचे निर्देश दिले.
More Stories
पुणे: शहराच्या प्रवेशद्वारावर व्हीआयपी स्वच्छतागृह
.. तर पुण्याचे महापौरपद आऱपीआयला मिळावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी
एम्प्रेस गार्डन मध्ये पुष्प प्रदर्शन आजपासून नागरिकांसाठी खुले