पुणे, ०४/०४/२०२३: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील रखडलेले रस्ते, पाणी प्रश्न, वाहतुक कोंडी अशा प्रमुख प्रश्नांबाबत महापालिकेकडे पाठपुरावा करून कार्यवाही होत नसल्याने आमदार सुनिल टिंगरे यांनी महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ थेट उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या गुरूवारी (दि.6) रोजी सकाळी दहा वाजता ते उपोषणाला बसणार आहेत.
उपोषणाबाबत माहिती देताना आमदार टिंगरे म्हणाले, वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रलंबित आहेत. याबाबत मी महापालिका आयुक्तांकडे बैठका, प्रत्यक्ष भेटी, पत्रव्यवहार निवेदने यामाध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशानात हे प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधले. मात्र, प्रशासनाकडून केवळ वेळकाढूपणा चालू आहे. त्यामुळे अखेर उपोषणाचा मार्ग स्विकारला लागला आहे. जोपर्यंत प्रशासनाकडून मतदारसंघातील प्रश्नांवर ठोस कार्यवाही होणार नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहिले असेही त्यांनी आमदार टिंगरे यांनी सांगितले.
या प्रश्नांसाठी उपोषण करणार
हे उपोषण प्रामुख्याने पोरवाल रस्ता व नगर रस्त्यांवरील वाहतुक कोंडी, नदी काठचा रखडलेला रस्ता, विश्रांतवाडी, शास्त्रीनगर आणि खराडी बायपास चौक येथील प्रस्तावित उड्डाणपुलांची कामे सुरू करणे. लोहगावचा पाणी प्रश्न, खंडोबामाळ रस्ता व इतर डीपी रस्ते. सिध्दार्थनगर झोपडपट्टी पुर्नवसन, मतदारसंघातील विविध भागांमध्ये पावसाळी पाणीलाईन टाकणे, धानोरी लक्ष्मी टाऊनशीप ते स्मशानभुमी रस्ता, पॅलेडियम रस्ता स.न. 6 रस्ता आणि विश्रांतवाडी चौकातील बुध्दविहार स्थलांतरीत करणे हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि प्रशासनाचे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण असणार आहे.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही